पृष्ठे

मराठ्यांच्या बदनामीचे हिरवे कारस्थान

शिव-समर्थांचे विस्मरण हे राष्ट्राचे मरण... उभ्या भारतवर्षात मराठ्यांइतका अतुलनीय पराक्रम कुणीच गाजविलेला नाही, हा इतिहास आहे...कुणाविरुद्ध लढले मराठे? स्वधर्मियांविरुद्ध ? त्याची गरजच काय असेल, हे होणे शक्यच नाही!
 ते लढले ते जुलमी पाशवी परकीय यवनांविरुद्ध, त्यांच्या जुलमी धर्माविरुद्ध...नुसते लढले नाहीत...तर ओडीशातील कटक ते थेट अफ़गाणातील अटक पर्यंत मराठ्यांनी भगवा झेंडा फ़डकवला!
 दिल्लीचे तख्त फ़ोडून तिथेही भगवा ध्वज दिमाखात फ़डकला! 
मराठा म्हणजे धर्मनिष्ठा! 
मराठा म्हणजे राष्ट्रनिष्ठा! 
मराठा म्हणजे स्वामीनिष्ठा! 
मराठा म्हणजे अतुलनीय पराक्रम! 
मराठा म्हणाजे पावित्र्य, शील, कुलीनता! 
यवन तर इथुन गेले...बर आपला देश बराचसा अखंड राहिल्याने आता हल्ला करून भारतास हरविणॆ शक्य नाही! मग काय करायचे?
 तर भारतीयांचा स्वाभिमानच हिरावून घ्यायचा, हे सूत्र काही चाणाक्ष यवनांच्या ध्यानात आले! 
आणि मग तेलातून आलेला वारेमाप पैसा ओतून एक नवी युद्धनिती (warfare) त्यांनी अवलंबली! फ़ुट पाडण्याची! त्यांना माहिती होते की मराठ्यांचा तेजस्वी इतिहास जोवर जिवंत आहे तोवर आपली डाळ शिजणार नाही! मग त्यांनी काही जाणते राजकारणी आणि फ़ितुरांना हाताशी धरून, त्यांना मुबलक पैसा चारून एक डाव या महाराष्ट्रात मांडला! कुणाही सूज्ञाच्या सहज लक्षात यावा इतका सोपा डाव! 
महाराष्ट्राच का? कारण या राज्यासारखा इस्लाम वर वचक आजवर जगात कुठल्या देशाला बसविता आलेला नाही!
 याचे मूळ स्त्रोत कोण? 
१) राजमाता जिजाऊ साहेब 
२) निर्धारितम्लेंछक्षय छत्रपती शिवराय 
३) म्लेंछक्षयदीक्षित छत्रपती संभाजी महाराज 
४) राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज! 
५) मराठे (ज्यात क्षत्रीय, वैश्य, शूद्र ब्राह्मण अशा सर्व वर्णांचे राष्ट्रभक्त आले) 
मग या पाचांचे होईल तितके चारित्र्यहनन करा! समाज घडवू पहाणा-या जातींची मानहानी करा! आणि मग सैरभैर झालेल्या बहुजनांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढा! कुणाही किरकोळ डोके असलेल्या माणसालाही सहज कळॆल अशा पद्धतीने हे कार्य सुरु आहे... 

परंतु यामुळे कुलीन मराठा समाजाची जी हानी होते आहे ती भरून काढल्याखेरीज गप्प बसेल तो मराठा नव्हेच, हे लक्षात असूद्या! वाघाचे कातडे पांघरून फ़िरणा-या कुत्र्यांनो, सावधान! खरा वाघ जागा होण्याची वेळ आलेली आहे! -एक सच्चा राष्ट्रभक्त मराठा