शिव-समर्थांचे विस्मरण हे राष्ट्राचे मरण...

शिव-समर्थांचे विस्मरण हे राष्ट्राचे मरण...-एक सच्चा राष्ट्रभक्त मराठा

शिवचरित्राचे अभ्यासक का मारेकरी ?


१) संभाजी ब्रिगेडचा आणि छत्रपति शिवाजी महाराज्यांच्या इतिहासाचा काडीमात्रही संबंध येत नाही. मुळात ‘संभाजी’ हा पर्शियन अपभ्रंशित उच्चार आहे. मूळ शब्द ‘शंभू अथवा शंभाजी’ असाच आहे. शिवरायांचे कुळदैवत शंभू महादेव त्याच नामावरून त्यांनी आपल्या जेष्ठ सुपुत्राचे नाव ठेवले होते. शंभाजी राजांच्या नाण्यांवर (श्री. राजा शंभु), मुद्रेवर ‘श्री शंभू शिवराजस्य...’, तसेच पत्रांवरही ‘शंभू’ असाच स्पष्ट उल्लेख आढळतो. पर्शियन लिपीत ‘श’ हे अक्षर नसल्याने त्याचा उल्लेख यवनांकडून ‘सिवा’ (शिवाजी नव्हे), ‘संभा’ (शंभाजी नव्हे) असाच त्रुटीत/अपभ्रंशित केला जाई. जे सर्वाथैव चुकीचे आहे. दुसरा शब्द ब्रिगेड, हा ही एक फिरंगी शब्द आहे. त्यामुळे ज्या दिंदवी स्वराज्या संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांनी आपल्या ‘न भूतो न भविष्यति’ अशा भव्य-दिव्य ‘जेष्ठ शुद्ध त्रयोदशी’ला केलेल्या राजाभिषेकानंतर व्यवहारातील पर्शियन, उर्दू भाषेचे वर्चस्व झुगारून आपली नाणी देवनागरी लिपीत पाडली, प्रचलित पर्शियन, अरेबिक शब्दांना संस्कृतप्रचुर प्रतिशब्द शोधून ‘राजव्यवहार कोष’ सिद्धं करवला त्या धर्माभिमानी (म्हणजे इतर धर्माचा दुस्वास नव्हे) राजाचा आणि या यावनी-फिरंगी नामयुक्त संस्थेचा दूरान्वयानेही संबंध नाही हे ध्यानात घेणे सर्व प्रथम आवश्यक आहे.

२) यांनी आजवर शिवरायांच्या आचारांच्या, विचारांच्या, नीतीच्या विरोधात उपक्रम करून, समाजस्वास्थ्य बिघडवून, जातीनिहाय राजकारणाची कास धरून निव्वळ ब्राम्हणद्वेष म्हणजेच शिवरायांचा ‘खरा इतिहास’ असे वारंवार सांगण्यातच अभिमान बाळगला, नव्हे तर तसेच आचरणही केले. शिवरायांच्या उच्च मूल्यांचा बळी तर ही मंडळी पदोपदी देत आहेत. कधी दादोजी कोंडदेव, कधी मोरोपंत पंतप्रधान, अण्णाजी दत्तो सुरनीस, कधी अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अशांचीच नावे घेत आपले जातीनिहाय राजकारण साधायचे. मात्र ज्या भोसले घराण्याने दादोजींना, मोरोपंतांना, सोनोपंत डबीरांना अत्यंत मानाने वागवले त्याच व्यक्तींवर चिखलफेक करून ही मंडळी ब्राम्हणांचा नव्हे तर खुद्द महाराष्ट्राला प्रथम पूजनीय अशा ‘भोसले’ घराण्याचाच उपमर्द करत आहेत असे म्हटले तर ते चूक ठरू नये. श्री क्षेत्र महाबळेश्वरी मातृभक्त शिवरायांनी जिजाऊसाहेबांची ‘सुवर्णतुला’ केली त्याचवेळी त्या श्रीमंत योग्याने शहाजीराजांपासून निष्ठेने स्वराज्याची सेवा करणाऱ्या सोनोपंत डबीरांचीही सुवर्णतुला केली. दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर अनेक उपलब्ध पत्रांत त्यांचा आदरार्थी उल्लेख करणारे आचारशील, विचारशील शिवराय ‘आपण पोरके झालो’ असाही उल्लेख करत आहेत. शिवराय स्वराज्याच्या निष्ठावान सेवकाला या शब्दांनी धन्य करीत असतांना या संघटना त्यांचे पुतळे हटवून खुद्द छत्रपति शिवरायांच्याच अमर आत्म्याला अत्यंत क्लेष देत आहेत यात कोणतीही शंका नाही.

३) कोण्या एका निलाजऱ्या आंग्ल लेखकाच्या टुकार पुस्तकाबद्दल वादळ उठवून अख्ख्या महाराष्ट्राला त्या हीन शब्दांचा/वाक्याचा परिचय करून देऊन ब्राम्हण जातीतील लेखकांबद्दल विनाकारण गरळ ओकणारी ही सारी मंडळी काही वर्षांपूर्वी मालेगावमध्ये गणपतीची मूर्ती निहाल अहमदने लाथाडली तेव्हा ‘ब्र’ सुद्धा काढू शकली नाहीत. ज्या भांडारकर इंस्टिट्यूटवर बेगुमानपणे हल्ला चढवून त्या वास्तूतील ग्रंथसंपदा याच पराक्रमी वीरांनी(?)पायदळी तुडवली, फाडली, जाळली, नासधूस केली त्यांना सोप्या शब्दांत सांगावेसे वाटते की त्या साऱ्याच पुस्तकांत पानापानांवर, वाक्या-वाक्यांमध्ये शहाजी महाराज, जिजाऊ साहेब, शिवराय, शंभाजी महाराज, राजाराम महाराज आदि महाराष्ट्रालाच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाला वंदनीय अशा व्यक्तींचीच नावे, उल्लेख, छायाचित्रे होती. विकाराने विचारांवर मात केली की असे घडते. याचेच गोंडस नाव म्हणजे ‘असंतोष’. ज्या बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या विरोधात यांचे सूर काळी सातला पोहोचतात ते नव्वदीतील शिवशाहीर म्हणतात की मी अजूनही शिवचरित्राचा एक छोटासा विद्यार्थीच आहे. त्यांना एकेरी नावाने उल्लेखून आपण उच्च पदाला जाऊ शकत नाही. तसेच आमचे स्पष्ट मत असे आहे की आपल्या कथनानुसार जर बाबासाहेब हे कोळसा आहेत तर इतकी वर्षे महाराष्ट्रातच, देशातच नव्हे तर परदेशातही शिवचरित्राचा सुगंध पसरवणारे, क्षणेक्षणी झिजणारे चंदन कोठे सापडेल ते दाखवावे अन्यथा व्यक्तीद्वेषातून, जातीद्वेषातून त्यांना लाखोली वाहणे थांबवावे.

४) मालवण नजीकच्या कुरटेबेटावर जेव्हा शिवरायांनी सिंधुदुर्गाचा पहिला चिरा पूजला तेव्हा त्यांनी स्थानिक उपाध्ये जानभट व दादंभट अभ्यंकर यांना पौरोहित्य करण्यास पाचारले, तेव्हा प्राणभयाने दोघेही सुरूवातीस येईनात तेव्हा त्यांना राजी करून, दिलासा देऊन मग त्या दुर्गाचे कायमस्वरूपी उपाध्येपण दिले. शिवनिधनोत्तर कालखंडात जेव्हा सिंधुदुर्ग पाडाव झाला तेव्हाही या घराण्याने “अखेरपर्यंत सेवा करीन” ह्या शिवरायांना दिलेल्या शब्दांशी ईमान राखून गड सोडण्यास नकार दिला. अफजल वधावेळी कृष्णाजी भास्कर या ब्राम्हणाने महाराजांवर तलवार धरली म्हणून वारंवार उल्लेख केला जातो पण त्याच अफजलच्या अंगरक्षकांत शंकराजी व पिलाजी मोहिते हे शिवरायांचे नातलग, तसेच त्यांचे चुलत चुलते मंबाजीराजे भोसले, जे त्याच लढाईत मारले गेले, त्यांच्याबद्दल अवाक्षरही निघत नाही. ज्या शंभाजी महाराजांच्या नावाने या भ्रष्ट संघटना सुरू आहेत त्या धर्मवीर छत्रपतिंना पकडून देण्यात त्यांचेच मेव्हणे व खुद्द शिवरायांचे जामात अशा दुहेरी नातेसंबंधात असूनही सदैव स्वराज्याच्या उदात्त हेतूऐवजी स्वतःच्या वतनाचाच आत्मकेंद्रित विचार करणारे गणोजी शिर्के हे प्रशंसेला पात्र ठरतात का? शंभाजी महाराजांसोबत वीरमरण पत्करणारे कवी कलश हे मात्र यांच्या दुर्दैवाने ब्राम्हण होते. थोडे मागे जाऊन पाहता, खुद्द शिवरायांच्या वडिलांवर म्हणजेच शाहाजी राजांवर तलवारीचा घाव घालणारे हे त्यांचेच ‘श्वशुर’ लखुजीराव जाधवराव होते हे इतिहासासही मान्य आहे. खुद्द सावत्रबंधू एकोजीरोजे हे ही अनेकदा शिवरायांविरूद्ध युद्धास ठाकले होते.

५) मुळात शिवचरित्र हा जातीयतेचा चष्मा लावून वाचण्याचा, अभ्यासण्याचा अथवा विवेचन करण्याचा विषय नाही. जे आजवर या देशात कधी घडले नव्हते ते छत्रपति शिवरायांनी अठरा पगड जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र करून, स्वराज्याच्या महान सूत्रात बांधून हे पार्थ-पराक्रमी कार्य घडवून आणले. यात जसे पिढीजात वतनदार, पाटील, देशमुख, कुलकर्णी होते तसेच सर्वसामान्य घराण्यातील पण आपल्या असामान्य कामगिरीने शिवचरित्रात मानाचे पान लिहिणारेही अनेक झाले. त्यांच्याकडे हा अमका, तो तमका अशा विशिष्ट मनोवृत्तीने न पाहता हिंदवी स्वराज्यस्थापनेकरिता त्यांनी केलेले अजोड, प्रामाणिक प्रयत्न लक्षात घेणे हेच खऱ्या इतिहासअभ्यासकाचे लक्षण आहे. एकाच जातीला टार्गेट करून विनाकारण समाजमन कलुषित करून स्वार्थ साधण्याचे उद्योग आता सोडले पाहिजेत. वर्षानुवर्षे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अव्याहतपणे राजरोस विकली जाणारी छत्रपती शंभाजी महाराजांच्या नावाची संभाजी बिडी सुद्धा हे बंद करू शकत नाहीत त्यांनी व्यर्थ ‘खरा इतिहास’ या नावाखाली लोकांना भडकवू नये इतकीच अपेक्षा.

 
महाराष्ट्रातील शिवभक्तांची दिशाभूल करण्याचा जोरदार प्रयत्न कोल्हापूरवासीय विशिष्टं संघटनांकडून होत आहे. राजाभीषेकदिन तारखेप्रमाणे साजरा करण्याचा प्रयत्नं तसेच त्यानिमित्ताने समाजमन भडकवून शिवभक्तीचे नारे दिले जात आहेत. सरकारला हा विषय नीट न समजल्यामुळे सरकार त्याला पाठिंबा देत आहे.
शिवराजाभिषेक सेवा समिती दुर्गराज रायगड
www.shivrajabhishek.com

ब्रिगेड या शब्दाचा उगम

ब्रिगेड या शब्दाचा उगम माहिती आहे?
इस्लामचा शेवटाचा प्रेषित महंमद पैगंबर याने मक्केवर हल्ला करण्याची योजना आखली. त्याकाळी तेथे कुरेश लोक राज्य करीत...ते फ़ार शूर असल्याने या युद्धाला कुणी तयार होईना, अखेर ३१३ लोकच यासाठी तयार झाले. ७७ मुजाहिर आणी २३६ अन्सारी...हे युदध "बद्रची दुसरी लढाई" म्हणून प्रसिद्ध आहे..

यांना घेऊन महंमदाने कुरेशांवर स्वारी केली व सुमारे १००० शत्रू समोर असूनही विजय मिळवला...(मृत सैनिकांवर अनन्वित अत्याचार करून त्याने अन्य कुरेशांचे मनोबल खच्ची केले )
या विजयाने रोमांचित होऊन त्याने अशी दंतकथा पसरवली को जो कुी असे युद्ध खेळेल (जिहाद) त्याला देवदूत येऊन मदत करतील...व तो विजयी होईल...

इथून पुढे इस्लामिक जगतात या सैन्याला "३१३ ब्रिगेड" या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही अतिरेकी आप्ल्या गटांना ३१३ ब्रिगेड हेच नाव देतात...गूगल करून पहा...

आता देशद्रोह्यांकडे वळू...

आपल्या देशाचे विभाजन करण्यासाठी गेली ८०० वर्ष टपलेल्या लांड्यांना ते मैदानावर साध्य न झाल्याने व आता खिशात तेलाचा पैसा खुळखुळू लागल्याने ही नवी रणनीती त्यांनी आखली...

देशद्रोह्यांना हेरून त्यांचे संघटन करून त्याला ब्रिगेड हे नाव द्यायचे व खरे रूप उघडे पडू नये यासाठी समाजाला आदर्श असलेल्या कट्टर धर्मभक्तांची नावे त्याला द्यायची...

याचेच उत्तम उदाहरण म्हणजे...
संभाजी ब्रिगेड
जिजाऊ ब्रिगेड
शिवाजी मुस्लिम ब्रिगेड
आता जरा जगातील अन्य ब्रिगेडची नावे पाहू...ही सर्व नावे अशीच्या अशी गूगल करून आपण खात्री करून घेऊ शकता!
नुकताच पाकिस्तानात झालेला एका चर्चवरचा सर्वात भयानक हल्लाही अशाच एका शोहदा ब्रिगेड  नामक संघटनेने केला...
 
अन्य काही ब्रिगेडस् खालीलप्रमाणे 
Al-Tawhid Brigade al-Quds Brigades
मुस्लिम महिला ब्रिगेड
The 'Islamic Brigade'
शहीद ब्रिगेड
Azzam Brigade
सोल्र्जस फॉर सॅक्रिफाइस ब्रिगेड
Al-Islam Brigade
Arab Revolutionary Brigade
Islamic International Peacekeeping Brigade (IIPB)
International Islamic Brigade
Abul Abbas Brigade
Farouq Brigade
martyrdom brigade
Syria Martyrs Brigade         


अधिक माहितीसाठी पहा

http://www.faithfreedom.org/Articles/AbulKasem40730.htm

http://alisina.org/

Source - Internet...

मराठ्यांची वैचारीक फसवणूक


-------------------------------
खेडेकर कोकाटे हे मराठा जातीची वैचारीक फसवणूक करत आहेत. त्यामागे त्यांचे काही गुप्त हेतू नक्कीच असले पाहीजेत. त्यांचे हेतू त्यांनी पुरे करुन घ्यावेत, पण त्यासाठी संपुर्ण मराठा जातीला बदनाम करु नये. खेडेकर-कोकाटे यांचा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड म्हणजे संपुर्ण मराठा जात नाही. पण समाजात खेडेकर-कोकाट्यांच्या वर्तनामुळे सार्‍या मराठा जातीची नाचक्की होत आहे . खेडेकर त्यांच्या कार्यप्रणालीप्रमाणे प्रत्येक गोष्ट भावनेशी जोडून सांगत आहेत. आणि मराठा जातीचा बुद्धीभेद करत आहेत. यासाठी एकच उदाह्रण पाहीले तर खेडेकरांचा कावा आपल्या लक्षात येईल. "बहुजनांचा सांस्कृतीक इतिहास" या आपल्या पुस्तकात खेडेकर लिहितात- "शंभुराजांची हत्या बामनांनी मनुस्मृतीच्या कायद्यानुसार केली. सर्व शिक्षा एकाच वेळी आमलात आणल्या त्यामुळे शंभुराजांची घोर विटंबणा बामनाअंनी केली, वेदाभ्यास व संस्कृत पंडीत होण्याचा बामनांचाच अधिकार असताना शंभुराजे स्वत: जगातील अत्यंत हुशार थोर संस्कॄत पंडीत होते. बहुजन समाजास संस्कृत भाषेचा अधिकार नसतानाही शंभुराजे संस्कृतपंडीत होऊन बामनांचाही पराभव करतात. त्यामुळे शंभुराजे बामनांच्या हाती पडतात बामनांनी शंभुराजांचे डोळे फोडले, कानात तेल ओतले, जिभ कापली, शिरच्छेद केला, शरीराचे तुकडे तुकडे केले, चामडे काढले, शंभुराजांचे शिर म्हणजे डोके उंच बांबूवर लटकवून तूळापूर, वडू आपटी परिसरात मिरवले" (पान.नं. २४)
खेडेकर म्हणतात की ब्राम्हणांनी खोटा इतिहास लिहिला, पण औरंगजेबाच्या दरबारी इतिहासात तर खोटेपणा नसेल ना ? इश्वरदास नावाच्या गुजरातमधील माणसाने "आरमगीर विजय" नावाचा ग्रंथ लिहिला आहे. तो नेहमी औरंगजेबाच्या छावणीत राहत असे. त्याने आपल्या आंखो देखा इतिहास धर्मविर संभाजी महाराजांच्या वधाचा इतिहास असा लिहिला आहे. मूळ फारशी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ सेतू माधवराव पगडी यांनी मराठीत अनुवादीत केला आहे. त्यातील संभाजी वधाचा उतारा असा --
बहदुरखान आणि इखलासखान हे आपले सैन्य तयार करुन युद्धास तयार झाले. त्यांनी त्वरा करुन फरुन चहुंकडून संभाजीला घेरले व त्यावेळी उभय पक्षांत मारामारी झाली. संभाजीच्या बरोबर असलेले चारशे सैनीक मारले गेले. मोंगलांचे जवळजवळ आडीचशे सैनिक मॄत्युमुखी पडले. संभाजीनेही पळून जाण्याचा बेत केला, पण त्याचा बेत सिद्धीस गेला नाही. तो मोंगलांच्या हाती कैद झाला. वाईट कर्माची फळे वाईटच होतात. कविकलश यास त्याच्या कृत्याची फळे मिळाली. संभाजी बरोबर तो पण कैद होऊन मोगलांच्या तावडीत सापडला.
संभाजीला कैद केल्याची बातमी बादशहाला शहाजादा आजम याच्या पत्रावरुन समजली. इखलासखानाचा हरकारा खंडूजी याने बादशहापाशी येऊन सगळी हकिकत सांगीतली. त्यानंतर ही बातमी सगळीकडे जाहीर झाली. यानिमित्त लष्करात आनंदनिदर्शक अशी वाद्ये वाजविण्यात यावीत अशी बादशहाने आज्ञा केली. बादहशाबरोबर असलेल्या मोठमोठ्या अमिररावांनी बादशहाला नजराणा देऊन या विजयाबद्दल त्याचे अभिनंदन केले. खंडूजी हाराकारा यास खूप बक्षीस देण्यात आले..
इखलासखान आणि बहादुरखान यांस सन्मानाची बढती, बहुमानाचे पोषाखम जवाहाराचे खंजीर, हत्ती-घोडे इत्यादी देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संभाजीला तरतुदीने आणि बंदोबस्ताने दरबारात घेवून यावे अशी त्यांना आज्ञा करण्यात आली.
बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलासखाण आणि बहादूरखाण हे संभाजी , कविकलश आणि त्यांचे इतर साथीदार यांना घेवून बादशहाच्या छावणीत पोहोचले. बादशहाने आज्ञा केल्यावरुन इखलासखान आणि हमिदुद्दुनखान यांनी संभाजी, कविकलश आणि त्यांचे इतर साथीदार यांची उंटावरुन धिंड काढली. त्यांची हजारप्रकारे फजिती करण्यात येत होती. अशाप्रकारे त्यांना चावणीत आणन्यात आले . दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर बादशहाच्या आज्ञेने त्यांना न्यायालयाजवळ उभे करण्यात आले. बादशहाने संभाजी कडे पाहीले. त्याची दुर्दशा पाहून बादशहाच्या मनावर परिणाम झाला. त्यानंतर बादशहा सिंहासनावरुन उतरला आणि त्याने प्रार्थना करुन परमेश्वराचे आभार मानले.
पण संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याची अशी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणुन यत्किंचीतही मान लवविली नाही. इखलासखान आणि हमिदुद्दिनखान यांनी त्याला पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बादशहाने आज्ञा केली की सिकंदरखानच्या तंबूजवळ एक जागा ठरवून संभाजीला अशाच स्थितीत ठेवण्यात यावे, कविकलश आणि त्याचे साथिदार यांच्यावर कडक नजर ठेवण्यात यावी. त्यांच्या पायात बेड्या ठोकण्यात याव्या.
यानंतर दोन दिवसांनी बादशहाने रहुल्लाखान यास खालीलप्रमाणे आज्ञा केली, "तुम्ही जाऊन संभाजीपाशी चौकशी करावी की तुझे खजीने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुटेह आहे ? तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करुन संबंध ठेवीत होते. "
पण माणसाची जिवीताची आशा सुटली कीति मनात येईल ते बडबडत सुटतो. संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याने बादशहासंबंधी घाणेरडे शब्द उच्चरले आणि त्यांची निंदा-नालस्ती केली. त्याने जे काही म्हटले ते जसेच्या तसे रहुल्लाखानने बादशहाला सांगीतले नाही, पण ते बोलणे कशा प्रकारचे होते याचा त्याने बादशहास इशारा दिला. यावर बादशहाने आज्ञा केली की संभाजी च्या डोळ्यात सळई फिरवून (त्याला आंधळा करुन) त्याना नविन दृष्टी द्यावी (वठणीला आणावे).
य्त्याप्रमाणे करण्यात आले, पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याने त्या दिवसापासुन जेवणखाण सोडले. त्याच्या पहारेकर्‍यांनी त्याला अन्नसेवन करण्यास पुष्कळ सांगीतले , पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला काही उपास घडले, शेवटी ही बातमी राजाच्या काणावर गेली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशहाच्या आज्ञेने त्याला वधस्थंबाकडे नेण्यात आले. तेथे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. संभाजीचे डोके अओरंगाबादेहून बुर्‍हाणपुरापर्यंत फिरवण्यात आले. यानंतर ते दिल्लिला नेण्यात येवून शहराच्या स्वारावर लटकवण्यात आले. (मोगल-मराठा संघर्ष , पान नं . ३०-३१)
खेडेकरांचा इतिहास आणि इश्वरदासचा प्रत्यक्षदर्शी इतिहास आपण समजुन घेतला पाहीजे. खेडेकरांना मराठा समाजाची फसवणूक करायची आहे. ब्राम्हणांविरुद्ध उभे करुन सामाजिक असंतोष निर्माण करायचा आहे आणि त्याच अट्टाहासापोटी हे मराठ्यांचा कट्टर शत्रू औरंगजेबाला निर्दोष सोडवण्याचे धाडस करतात. प्रसंगी त्याचे उदात्तिकरण करण्यातही मागेपुढे पाहत नाही. ज्या धर्मांध औरंगजेबाने संभाजी राजांचा क्रूरपणे वध केला, आपल्या जन्मदात्या आई वडीलांना कैदेत टाकले, भावांची हत्या केली. संभाजी राजांची पत्नी महाराणी येसूबाई व पुत्र शाहू राजे यांना १७ वर्षे कैदेत डांबून त्यांचा अतोनात छळ केला./ त्याच औरंगजेबाला खेडेकर कोकाटे, देशमुख धर्माने वागणारा स्त्री दाक्षीण्यवादी असलेला औरंगजेब म्हणतात हा मराठ्यांचा घोर अपमाण आहे. हे मराठ्यांनी समजुन घेतले पाहीजे.

- रविंद्र गोळे
( शिवरायांचा देशधर्म पुरुशोत्तमांचा द्वेशधर्म या पुस्तकातुन साभार )

मराठ्यांच्या बदनामीचे हिरवे कारस्थान

शिव-समर्थांचे विस्मरण हे राष्ट्राचे मरण... उभ्या भारतवर्षात मराठ्यांइतका अतुलनीय पराक्रम कुणीच गाजविलेला नाही, हा इतिहास आहे...कुणाविरुद्ध लढले मराठे? स्वधर्मियांविरुद्ध ? त्याची गरजच काय असेल, हे होणे शक्यच नाही!
 ते लढले ते जुलमी पाशवी परकीय यवनांविरुद्ध, त्यांच्या जुलमी धर्माविरुद्ध...नुसते लढले नाहीत...तर ओडीशातील कटक ते थेट अफ़गाणातील अटक पर्यंत मराठ्यांनी भगवा झेंडा फ़डकवला!
 दिल्लीचे तख्त फ़ोडून तिथेही भगवा ध्वज दिमाखात फ़डकला! 
मराठा म्हणजे धर्मनिष्ठा! 
मराठा म्हणजे राष्ट्रनिष्ठा! 
मराठा म्हणजे स्वामीनिष्ठा! 
मराठा म्हणजे अतुलनीय पराक्रम! 
मराठा म्हणाजे पावित्र्य, शील, कुलीनता! 
यवन तर इथुन गेले...बर आपला देश बराचसा अखंड राहिल्याने आता हल्ला करून भारतास हरविणॆ शक्य नाही! मग काय करायचे?
 तर भारतीयांचा स्वाभिमानच हिरावून घ्यायचा, हे सूत्र काही चाणाक्ष यवनांच्या ध्यानात आले! 
आणि मग तेलातून आलेला वारेमाप पैसा ओतून एक नवी युद्धनिती (warfare) त्यांनी अवलंबली! फ़ुट पाडण्याची! त्यांना माहिती होते की मराठ्यांचा तेजस्वी इतिहास जोवर जिवंत आहे तोवर आपली डाळ शिजणार नाही! मग त्यांनी काही जाणते राजकारणी आणि फ़ितुरांना हाताशी धरून, त्यांना मुबलक पैसा चारून एक डाव या महाराष्ट्रात मांडला! कुणाही सूज्ञाच्या सहज लक्षात यावा इतका सोपा डाव! 
महाराष्ट्राच का? कारण या राज्यासारखा इस्लाम वर वचक आजवर जगात कुठल्या देशाला बसविता आलेला नाही!
 याचे मूळ स्त्रोत कोण? 
१) राजमाता जिजाऊ साहेब 
२) निर्धारितम्लेंछक्षय छत्रपती शिवराय 
३) म्लेंछक्षयदीक्षित छत्रपती संभाजी महाराज 
४) राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज! 
५) मराठे (ज्यात क्षत्रीय, वैश्य, शूद्र ब्राह्मण अशा सर्व वर्णांचे राष्ट्रभक्त आले) 
मग या पाचांचे होईल तितके चारित्र्यहनन करा! समाज घडवू पहाणा-या जातींची मानहानी करा! आणि मग सैरभैर झालेल्या बहुजनांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढा! कुणाही किरकोळ डोके असलेल्या माणसालाही सहज कळॆल अशा पद्धतीने हे कार्य सुरु आहे... 

परंतु यामुळे कुलीन मराठा समाजाची जी हानी होते आहे ती भरून काढल्याखेरीज गप्प बसेल तो मराठा नव्हेच, हे लक्षात असूद्या! वाघाचे कातडे पांघरून फ़िरणा-या कुत्र्यांनो, सावधान! खरा वाघ जागा होण्याची वेळ आलेली आहे! -एक सच्चा राष्ट्रभक्त मराठा