शिव-समर्थांचे विस्मरण हे राष्ट्राचे मरण...

शिव-समर्थांचे विस्मरण हे राष्ट्राचे मरण...-एक सच्चा राष्ट्रभक्त मराठा

खेड्याचा माफ़ीनामा



पुरुषोत्तम खेडेकर'ने HIGHCOURT मधे AFFIDAVIT दाखल केले. त्याची ही प्रत- खाली मूळ प्रतीचे फ़ोटो पहा!!!
* शरणांगती- मराठी अनुवाद.
मी, पुरुषोत्तम सूर्यभान खेडेकर, वय ६५ वर्षे
रहनार: A6- मौर्या सोसाइटी, 2, नेलोर रस्ता,
कोरेगांव पार्क, पुणे
आणि
चिखली, बुलढाणा जिल्हा, विदर्भ
मी इथे शपत घेउन खालील बाबी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो.
१) याचिका कर्त्यावरिल आरोप हे देवगढ़ येथील F.R.I. No. 79/2012. यानी जामिन मिळावा म्हणून आदरणीय हाईकोर्टा कड़े अर्ज केला.
२) देवगढ़ चे PSI श्री कांबळे हे पुण्याला येऊन गेले आणि माझी जबानी नोंद केली. आणि सर्व संपर्क क्रमांक, पत्ते, नोंद करून घेतले. मी त्यांना सहकार्य केले, आणि पुढे ही करण्याचे वचन दिले. परंतु मला F.R.I. ची माहिती उशिरा मिळाली.
३) मराठीतील पुस्तके 'मराठयांचे रामदासीकरण' आणि' १८५७ ब्राम्हण पुराण' ही पुस्तके मी लिहिली आहेत आणि अनुक्रमे २००७, आणि २००८ या वर्षी जिजाई प्रकाशन यांच्या मार्फ़त प्रकाशित झाली. या पुस्तकांमध्ये काही 'काल्पनिक कथा', विनोद, अफ़वा, शाब्दिक पुरावे इ.समाजा मध्ये माझ्यामूळ पसरवले गेले. आता बर्याच स्त्रियांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.
४) 'मराठयांचे रामदासीकरण' आणि '१८५७ ब्राम्हण पुराण' या पुस्तकांमधील आक्षेपार्ह मजकूर आणि तक्रारी मध्ये नमूद केलेला मजकूर हां त्वरित वगळण्यात येईल, आणि (जगात) कोठेही माझ्याकडून प्रकाशित केला जाणार नाही. आणि भविष्यात ही याची काळजी घेतली जाईल.
५) माझ्या मनामध्ये स्त्रियां बद्दल खुप खुप आदर आहे. म्हणून, कोणत्याही समाजाच्या किंवा जातीच्या स्त्रीचा अपमान करणे हा माझा हेतु कधीच न्हवता आणि नसणार. माझ्या या विधानांमुळे खुप स्त्रियांच्या भावना दुखावल्या आणि मला त्या गोष्टीचे खुप खुप दुःख होत आहे. आणि माझ्या या (नीच) कृत्या बद्दल मी (संपूर्ण स्त्री जातीची) बिनशर्त माफ़ी मागतो.
६) मी आजच्या स्त्रीचे आणि त्यांच्या कर्तुत्वाचे कौतुक १८५७ या पुस्तकात पान क्रमांक १८, १९, २० वर केले आहे.
७) मी इथे जाहिर करू इच्छितो की इथून पुढे कधीही मी माझ्या लिखाणात किंवा पुस्तकांमध्ये अश्या पद्धतीचे (नीच) लिखाण करणार नाही.
८) अश्याच प्रकारचे आणखिन काही लिखाण जर आढळले तर ते ही त्वरित वगळले जाईल.
९) समाजामध्ये तेढ निर्माण करेल असे कोणते ही लिखाण मी लिहिणार नाही किंवा प्रकाशित करणार नाही.
१०) मी सांगू इच्छितो की हे प्रतिज्ञापत्र स्वखुशीने, कोणाच्या ही दबावाखाली न येता, आणि नशा न करता लिहित आहे. हे प्रतिज्ञापत्र देण्यासाठी मला याचिकाकर्त्यांनी किंवा आणखिन कोणी कोणताही दबाव आणलेला नाही आणि म्हणून हे प्रतिज्ञापत्र जर न्यायालयीन कार्यवाहिच्या कागदपत्रांमध्ये समाविष्ठ केले तर त्याला माझी काही हरकत नाही.
११) मी सांगू इच्छितो की वरील सर्व मजकूर हां खरा आहे.
प्रतिज्ञापत्र समाप्त........




मुंबई उच्च न्यायालयात पुरुषोत्तम खेडेकर
यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी जनहित
याचिका दाखल !
=============================
‘बहुजन हिताय’ पुस्तकामधून रामदास स्वामी,
लो. टिळक आणि रा.स्व. संघ यांच्यावर
चिखलफेक !
मुंबई, १९ डिसेंबर (वार्ता.) - हिंदुद्वेष्टे लेखक
पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या ‘बहुजन
हिताय’ या पुस्तकामध्ये
कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थानी असणारे
आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुवर्य
संत रामदास स्वामी, भारताच्या स्वातंत्र्य
चळवळीतील प्रणेते लोकमान्य टिळक
यांच्याविषयी ब्राह्मणद्वेषापोटी अत्यंत हीन
पातळीला जाऊन लिखाण केले आहे. तसेच
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बिनबुडाचे गंभीर
आरोप केले आहेत. या पुस्तकामुळे
कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक
भावना दुखावल्यामुळे श्री. दिलीप
अलोनी यांनी या पुस्तकावर
बंदी घालावी आणि त्याच्या प्रती जप्त
कराव्यात तसेच या पुस्तकाचे लेखक खेडेकर
आणि प्रकाशक किशोर कडू यांच्यावर योग्य
ती फौजदारी कारवाई करावी, या प्रमुख
मागणीकरता मुंबई उच्च न्यायालयात जनहित
याचिका दाखल केली आहे.
याचिकेत नमूद करण्यात आलेली सूत्रे
१. या पुस्तकामध्ये लेखकाने ‘हिंदु धर्म
भारताबाहेरील परकीय धर्म आहे. भारतात केवळ
बौद्ध आणि जैन धर्मियांची प्रार्थनास्थळे
होती; मात्र वैदिक ब्राह्मणांनी ती नष्ट
केली’, असे लिहून जाणीवपूर्वक हिंदुद्वेष
पसरवला आहे.
२. लेखकाने या पुस्तकामध्ये वारंवार ‘ब्राह्मण
हे अन्य भारतियांपेक्षा निराळे आहेत’,
असा उल्लेख करत ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद
निर्माण करून जातीद्वेष पसवण्याचा प्रयत्न
केला आहे.
३. लोकमान्य टिळक यांनी ख्रिस्ताब्द १८९३
मध्ये पहिली जातीय दंगल घडवली. त्यानंतर
त्यांनी हिंदू-मुसलमान यांच्यामध्ये वारंवार
दंगली घडाव्यात अशी व्यवस्था केली, असे लिहून
या लेखकाने राष्ट्रपुरुषांचा अवमान केला आहे.
४. मुंबईतील ख्रिस्ताब्द १९९३ मधील
बाँबस्फोटांची मालिका राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाने घडवली.
५. राज्य आणि केंद्र शासनांतील मुख्य पदे,
सर्वोच्च न्यायालय आणि देशातील सर्व उच्च
न्यायालयांतील मुख्य न्यायमूतींची पदे, सर्व
गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांमधील मुख्य पदे
यांवर रा.स्व. संघाने
स्वतःच्या विचारांची माणसे पेरली आहेत.
६. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे
रामदासी ब्राह्मण आहेत आणि ते
नेहमी मराठाद्वेष करतात.
७. ख्रिस्ताब्द २००८ मधील मालेगाव
बाँबस्फोटातील सर्व आरोपी ब्राह्मण असून
हेमंत करकरे यांना कसाबने नव्हे, तर याच
ब्र्राह्मणांनी ठार केले.
८. संत नामदेव, ज्ञानेश्वर, चोखामेळा, जनाबाई,
सोयराबाई, रवीदास, मीराबाई, कबीर,
एकनाथ, तुकाराम या सर्व संतांचे मृत्यू
अनैसर्गिक झाले असून त्यांना ब्राह्मणांनी ठार
केले आहे.
९. उपरोक्त सर्व आक्षेपार्ह लिखाण असलेले
पुस्तक लिहून लेखक आणि प्रकाशक
यांनी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक
भावना दुखावल्याने सदर पुस्तकावर
बंदी घालावी आणि लेखक आणि प्रकाशक
यांच्यावर भा.दं.वि. कलम १५३-अ, १५३-ब
आणि २९५-अ नुसार कायदेशीर कारवाई
करावी, अशी मागणी कायदेशीर नोटिशीद्वारे
मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे
करूनही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही.

लोकमत वृत्त

सर्व जाती-धर्माचा आदर करा - हायकोर्ट

  • First Published :19-October-2014 : 02:54:00

  • मुंबई : लोकशाही प्रणीत समाजात प्रत्येकाने सर्व जाती-धर्माचा आदर करायला हवा, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. स्वत:ची जात, धर्म व समाजाबाबत लिखाण  अथवा काम करण्यास कोणतेही र्निबध नाहीत. पण तसे करताना कायद्याच्या चौकटीत राहून अन्य जाती-धर्माचा व समाजाचा अवमान होणार नाही वा दोन समाजांत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
     साहित्यिक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करताना न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने हा सल्ला दिला आहे. खेडेकर यांनी त्यांच्या दोन पुस्तकांत दोन समाजांबाबत लिखाण केले आहे. हे लिखाण दोन समाजांत तेढ निर्माण करणारे आहे; तसेच महिलांचा अवमान करणारे आहे, अशी तक्रार सिंधुदुर्गच्या देवगडमधील स्वाती जितेंद्र बापट यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. खेडेकर व प्रकाशक किशोर साहेबराव कडू यांच्याविरोधात ही तक्रार आहे. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून खेडेकर व कडू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 
    2क्12मध्ये ही तक्रार नोंदवली. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने कारवाई करायला हवी होती. मात्र सरकारने कारवाई केली नाही हे धक्कादायक आहे, असेदेखील न्यायालयाने नमूद केले. पण खेडेकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून आपला महिलांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, असे न्यायालयासमोर स्पष्ट केले. तर असे लिखाण प्रकाशित केल्याबद्दल कडू यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र खेडेकर यांनी प्रतिज्ञापत्रत समाजासंदर्भात केलेल्या लिखाणाबाबत काहीच नमूद केले नसल्याचा ठपका न्यायालयाने 
    ठेवला.  (प्रतिनिधी)